HOME 1 | ||||
अंदाजपत्रक २०१८ - आर्थिक पारतंत्रतून मुक्ततेची शेवटची संधी
१९९१ मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात झाल्यावर परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे सोने गहाण ठेवण्यापासून आज ४१४ लाख डॉलर चलनसाठा पर्यंत आपण मजल गाठली. परंतु त्यामुळे आज आपण आर्थिक पारतंत्रात आहोत.
आर्थिक पारतंत्र कसे - शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण भांडवल मालक , परकीय गुंतवणूकदार, देशी गुंतवणूकदार , म्युच्युअल फंड , व जनता असे विभागले जाते,मालक , ५०%
परकीय गुंतवणूकदार, २५%
देशी गुंतवणूकदार , १०%
म्युच्युअल फंड , १०%
जनता ५% असे अंदाजे विभागले जाते.
म्हणजेच बाजारात उपलब्ध शेअर पैकी ५०% पेक्षा जास्त शेअर परकीय मालक व परकीय गुंतवणूकदार यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तेथे उत्पन्न होणारी संपत्ती ही परदेशात जाते . परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी दीर्घावधी भांडवललाभ कर हा रद्द करण्यात आला . आज देशी गुंतवणूकदारांचा वाढता सहभागामुळे शेअर भाव वाढत आहेत. देशातील पैसे देशातच राहण्यासाठी दीर्घावधी भांडवललाभ कर हा परकीय गुंतवणूकदार यांच्यावर अंदाजपत्रकात लागू केला जावा. परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे देशी गुंतवणूकदार स्वस्तात शेअर खरेदी करू शकतील. बाजाराच्या या महिन्याच्या आकडेवारीवरून परकीय गुंतवणूकदारानी विक्री करण्यास सुरवात केल्याचे दिसते त्यामुळे अंदाजपत्रकानंतर मोठी घसरण येऊ शकते. या विक्रीमुळे डॉलर मजबूत होऊ शकतो.
येत्या अंदाजपत्रकात दीर्घावधी भांडवललाभ कर लागू केल्याने देशातील उत्पन्न देशात राहून आर्थिक विषमता दूर होण्यास मदत होईल. सामान्य गुंतवणूकदाराने शेअर बाजारात कमी किंमतीत शेअर खरेदीस तयार राहावे. तसेच रेल्वे , आयुर्विमा यांचे शेअर सरकारने विक्रीस काढावे त्यामुळे भांडवल बाजाराचा पाया मजबूत होण्यास मदत होईल .